Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

कोविड उपाययोजनांसाठी नागपूर, पुणे विभागीय आयुक्तांना २८ कोटी ८० लाख ९६ हजाराचा निधी .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २९  जून : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे.याच धर्तीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व पुणे विभागाला रुपये २८ कोटी ८० लाख ९६ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबींनुसार करावयाचा खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर व पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेऊन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त नागपूर यांना १३ कोटी व विभागीय आयुक्त पुणे यांना रुपये १५ कोटी ८०लाख ९६ हजार असा एकूण २८ कोटी ८० लाख ९६ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विभागवार माहिती देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ६ कोटी ५० लाख आणि वर्धा ६ कोटी ५० लाख असे एकूण विभागीय आयुक्त नागपूर यांना १३ कोटी व विभागीय आयुक्त पुणे यांना रुपये १५ कोटी ८० लाख ९६ हजार असा एकूण २८ कोटी ८० लाख ९६ हजार इतका निधी वितरीत करण्यात आला असून तो बीम्स प्रणालीवर आधारित आहे.

या निधीमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तरी येणाऱ्या काळात कोव्हीड ला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील यासाठी निधीची कमतरता पडू देणार असेही विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली

हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.