Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 29 जून : गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहिम आय.डी.ए. दिनांक 01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असल्यामुळे या अंतर्गत जनतेला डी.ई.सी., आयवरमेक्टीन, आलबेडांझोल, गोळ्यांचे सेवन प्रत्यक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष करावयाचे असल्याने या मोहिमेचा शुभारंभ आज, दि. 29 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांचे दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशिर्वाद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली समीर शेख यांचे उपस्थितीत करण्यात आला.

एक दिवसीय समुळ उपचार मोहिमेचे औषध डी.इ.सी., आयवरमेक्टीन, आलबेडांझोल गोळ्यांचे सेवन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी समक्ष करुन जिल्ह्यातील समस्त जनतेला गोळया आरोग्य कर्मचाऱ्यासमक्ष सेवन करुन हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला शतप्रतिशत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त तर 13 नवीन कोरोना बाधित

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, ११२ कोरोनामुक्त तर १३ नविन कोरोना बाधित

 

Comments are closed.