Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, ११२ कोरोनामुक्त तर १३ नविन कोरोना बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 229.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर,दि. 29 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 13 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 664 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 908 झाली आहे. सध्या 229 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 56 हजार 682 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 69 हजार 295 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

हे पण वाचा : रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

गडचिरोली जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त तर 13 नवीन कोरोना बाधित

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

 

 

Comments are closed.