Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात वाघाचा हल्ला, शेतकरी जागीच ठार

 शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सावली 14, डिसेंबर :-  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला केला. वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच ग्रामस्थांनी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.

शोध घेतल्यावर घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे प्रेतच सापडले. वनविभागाने पंचनामा करून शवविच्छेदनसाठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या घटनेने खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे. सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.