Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि. २९ एप्रिल : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना चा प्रसार अधिक वाढत आहे.त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी आणि भाजी मार्केट साठी वेळेचे बंधन न ठेवता दिवसभर ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजी बाजार अन्न धान्य किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत खुली ठेवण्याचा चुकीचा नियम राज्य सरकार ने सुरू केला आहे. या वेळेच्या बंधनामुळे सकाळी या दुकानांवर भाजी बाजरात मोठी गर्दी उसळत आहे.त्यातून कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने भाजी बाजार यांना वेळेचे बंधन न ठेवता कोरोना पसरू नये याची काळजी घेत मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार ने घ्यावा अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे. वेळेचे बंधन न ठेवल्यास दुकानांवर भाजी बाजरात गर्दी होणार नाही असे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.