Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,प्रतिनिधी :- कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली च्या वतीने कारगील चौकात सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय लष्कर चे प्रमुख युद्ध शास्त्र चे रणणिती कार बिपीन रावत यांचा सह त्यांच्या पत्नी व अन्य लष्करी अधिकारांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व शहीद अधिकारी यांना शांती मिळण्याकरिता नागरिकांनी गडचिरोली येथील कारगील चौकात गडचिरोलीच्या नगराध्यक्षा सौ. योगिता प्रमोद पिपरे यांच्या अध्यक्षते खाली 11 डिसेंबर 21 ला संध्याकाळी 6 वाजता पुष्प व मेणबत्ती पेटवून श्रदांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर,राजू पुंडलिकर, पुरुषोत्तम शेंडे, नरेंद्र चन्नावार, सातपुते सर, प्रमोद कोत्तावर, नगरसेवक संजय मेश्राम, नगरसेवक मडावी, मोगली मसराम, रुपेश सलामे, आदी उपस्थित होते, कार्यक्रम चे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.