Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ फेब्रुवारी: श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी खा. अशोक नेते यांच्या हस्ते विधीवत पूजनाने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष वामन तुरके, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव जी फाये, सावलीचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, श्यामजी वाढई, राकेश राचमलवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.