Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कराडच्या विमानतळावर होणार फ्लाईंग स्कूल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सातारा, दि. १९ फेब्रुवारी: कराड येथील विमानतळावर लवकरच प्राइड अँकडमी यांच्याकडून फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परवेज दमानिया यांनी फ्लाईंग स्कूल सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी करुन माहिती दिली.

कराड येथील विमानतळ मुंबई, गोवा व पुणे या ठिकाणासाठी मध्ये केंद्र आहे. गोवा आणि पुणे विमानतळावर हवाई दलाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे खाजगी विमान वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. मात्र कराड विमानतळावर दमानिया अकॅडमी स्कूल सुरू करण्याबाबत दोन महिन्यात अंतिम निर्णय होईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी फ्लाइंग स्कूल सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दमानिया अकॅडमीने एक विमान कराड येथील विमानतळावर आणले होते. तसेच येथील धावपट्टीची पाहणी केली. देशात केवळ १० ठिकाणी तर महाराष्ट्रात ३ ठिकाणी हे स्कूल आहे. या स्कूलमध्ये स्थानिकांसह देशभरातून विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतील. तसेच त्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन खासगी विमान कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. या कोर्सच्या माध्यमातून कराड परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Comments are closed.