Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्ध्यात पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयाची घंटा बंद

वर्धा जिल्ह्याचे शाळा आणि महाविद्यालय पुन्हा बंद

वर्ध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वर्धा, दि. १९ फेब्रुवारी: जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालय पुन्हा बंदचा निर्णय घेतला आहे. वर्ग ५ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश धडकले आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज सुरू ठेवत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा देण्यात आली आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट येथील स्पंदन वसतिगृहातील 96 विद्यार्थी कोरोना पोसीटीव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली होती. कोरोना पोसिटीव्ह रुग्ण संख्येत विद्यार्थी येत असल्याने हा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.