Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मध्यप्रदेश येथून पिस्टल आणि जिवंत काडतुस विकण्यासाठी आलेल्या इसमाला उल्हासनगर पोलिसांनी अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कोन्स्टेबल प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की उल्हासनगर कॅम्प 1 येथे कलानी काॅलेज समोर एक इसम रिव्हाॅल्व्हर विकण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पथक तयार करून सदर ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याठिकाणी सापळा रचला असता एक इसम त्या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव हे मोहमद ईस्माईल शफी अब्बासी असून मध्य प्रदेशचा राहणारा असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या प्लॅस्टीकचे पिशवीत 2 पिस्टल त्यापैकी एका पिस्टलवर मेड इन जपान असे लिहीलेले, दुसरे एक सिल्व्हर रंगाचे पिस्टल आणि 5 जिवंत काडतुस मिळुन आले. त्याला पोलीस खाक्या दाखविला असता विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.