Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुरमाडी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १८ फेब्रुवारी: श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संघटना मुरमाडीच्या वतीने स्वखर्चाने व लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह राज्यमंत्री मा.ना. श्री हंसराज भैय्या अहिर जी यांच्या शुभ हस्ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार डॉ नामदेव जी उसेंडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवि भुसारी, जिप चे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पं स सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलासराव दशमुखे, भाजपचे किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,  जिप सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, प्रभाकरराव वासेकर,  भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, बनपूरकरजी, जिल्हा सचिव अविनाश महाजन व अन्य मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.