Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आम्ही शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काम करू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 31 जुलै :-  माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी आम्ही सदैव निष्ठेने राहून शिवसेनेसोबतच काम करून या अगोदरही आम्ही शिवसेनेसाठी काम केलं आत्तासुद्धा करत राहू करत आहोत आणि यापुढे सुद्धा करत राहू अशी दृढ निष्ठा वाडा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी हमी पत्राद्वारे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना सुपूर्द केली वाड्यामधील कट्टर शिवसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र ,आम्ही शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहोत असे हमीपत्र लिहून दिले.

आम्ही आतापर्यंत माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले तसेच पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि यापुढेही राहू अशी ग्वाही वाड्यातील कट्टर शिवसैनिकांनी लेखी स्वरूपात साहेबांना सुपूर्द केले. सध्याची परिस्थिती पाहता शिवसैनिकांनी नेते निवडून द्यायचे आणि नेत्यांनी आपला पक्ष बदलायचा अशाप्रकारे राजकीय घडामोडी चालत आहेत सध्या शिवसेनेमध्ये राजकारणामध्ये खूप मोठे खिंडार पडले आहे मोठ्या प्रमाणात गटबाजी चालू आहे. शिवसेनेतील निवडून दिलेले नेते बंडखोरी करत भाजपाला समर्थन देताना मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये दाखल झालेले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर पालघर मधील कट्टर शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश गंधे ,युवा सेना प्रमुख निलेश पाटील, माझी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख उमेश पठारे, उप तालुकाप्रमुख भावेश पष्टे माझी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, उपाध्यक्ष अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य उप अध्यक्ष अरुण ठाकरे, उपविभाग प्रमुख मनीष पाटील ई.नी कट्टर शिवसैनिक असल्याचे हमीपत्र बनवले आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.