Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये – विरोधी पक्षनेते अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 30 जुलै :- महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये , जर एखादा शब्द चुकलाच तर अशा मोठ्या पदावरील व्यक्तींनी एक टिपण लिहून त्यावरील स्पष्टीकरण द्यावे ,त्यामुळे वाद होणार नाही, महाराष्ट्राची संस्कृती महान आहे ,हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे ,शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या या महाराष्ट्रात अशा प्रकारचा वाद होता कामा नये असा सल्ला अजित पवार यांनी नांदेड येथे अतिवृष्टीनंतर झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहावी दिल्ली वारीवर बोलताना राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले की, त्यांनी दिल्लीला किती वेळा जावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे ,त्यांना ज्यांनी मुख्यमंत्री केलंय ते त्यांचं बघतील,
फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नबाबत विचार व्हावा, सोबतच मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही ,त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ,असाही टोला त्यांनी लगावला.

बाईट – अजित पवार
विरोधी पक्षनेते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘कोस्टल रोड’ दुस-या बोगद्याचे १००० मीटरचे खोदकाम पूर्ण

Comments are closed.