Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा जिंकू : संजय राऊत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 14 एप्रिल : आगामी 2024 च्या निवडणुकीत देशात शंभर टक्के परिवर्तन झालेलं असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी ते आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत व्यक्त केला. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीनं आशादायी चित्र असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात  लोकसभेच्या  48 पैकी 40 जागा जिंकू असेही राऊत म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांसोबतच आता विरोधकांकडून देखील 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर येणार आहेत. मात्र या सर्वांमध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, अजून असं काही ठरलं नाही. नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत की आणखी कोणी हा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.