Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार गावठी दारूच्या हातभट्ट्या नष्ट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

धानोरा, 13 एप्रिल :धानोरा तालुक्यातील धानोरा टोला येथील विक्रेत्यांनी लावलेल्या चार गावठी दारूच्या हातभट्ट्यासह मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कृती शहर संघटनेच्या महिलांसह मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. धानोरा टोला येथे जवळपास १५ विक्रेते सक्रिय आहेत. या टोल्यावर धानोरा शहरासह परिसरातील मद्यपींची रेलचेल असते. पोलिस विभागाच्या वतीने वारंवार कारवाई करूनही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. अशातच नदीपरिसरात हातभट्टी लावून दारू काढणे सुरू आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मुक्तिपथ शहर संघटनेच्या महिलांसह तालुका चमूने शोधमोहीम राबविली असता, चार हातभट्या सुरु असल्याचे निदर्शनास आले. महिलांना बघताच विक्रेत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी दारूभट्ट्या, मोहफुलाचा सडवा, दारू गळण्याचे साहित्य असा जवळपास २ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.