Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूरवाले मला म्यूट का करत आहेत! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मिश्किल सवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

नागपूर येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्षाचे आज (४ जानेवारी) उद्घाटन झाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ४ जानेवारी: नागपूर येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्षाचे आज (४ जानेवारी) उद्घाटन झाले. देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्टया नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील ३ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन उप राजधानी नागपूरमध्ये घेण्याची महाराष्ट्राची, नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. त्यामुळं नागपुरात आता विधानभवनात वर्षभर गजबजाट असणार आहे.  देशात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरकरांशी संवाद साधत असताना ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्यावेळी मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा नागपूरकरांशी हा संवाद सुरू असताना तांत्रिक कारणामुळे मध्येच माईक बंद झाला. तेव्हा नागपूरवाले मला मध्येच का म्यूट करत आहे, असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितलं आहे. नागपुरात आता कार्यालय सुरू झालं आहे. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असं ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.