Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपली कन्या, आपल्या दारी अंतर्गत भुसेवाडा येथे स्पर्धा – लाहेरी पोलिसांचा अनोखा उपक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एरवी पोलीस म्हटले की बंदोबस्त, तपास, गुन्हेगार, कायदा कलम ह्या गोष्टी दिसतात. परंतु गडचिरोली जिल्हा या पारंपरिक मतास काहीसा अपवाद असून इथे याबाबरोबरच पोलिसांना नक्षलविरोधी अभियान देखील करावे लागते.

महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या लाहेरी परिसरामध्येही पोलिस हे कर्तव्य पार पाडतात. परंतु इथला अतिदुर्गम भाग, नक्षल प्रभाव व त्यामुळे असलेली गरिबी, निरक्षरता पाहता ह्या गोष्टीव्यतिरिक्त ही अधिक करणे आवश्यक असल्याचे दर्शवतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अगदी हीच बाब लक्षात घेतली ती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या भागामध्ये आपली कन्या, आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत आधुनिक प्रशिक्षित महिला पोलिस अमलदारही अभियानात सहभागी होतात व त्याअंतर्गत परिसरातील अतिदुर्गम गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थ विशेष करून महिला, तरुणी, व बालकांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांची माहिती देत असतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याच्या जोडीला विरंगुळा म्हणून विविध स्थानिक स्पर्धांचे आयोजन केले जाते यामध्ये- संगीत खुर्ची, मटकी फोड, फुगे फोड, मेणबत्ती प्रज्वलन, इ. स्पर्धा आयोजित केल्या जातात. व सहभागी सर्वांना प्रोत्साहनात्मक बक्षीस दिले जाते.

अशीच तळ्यात-मळ्यात ही स्पर्धा भुसेवाडा येथे रंगली ज्यामध्ये वयोवृद्ध महिला ते बालिका यांनी हिरीरीने सहभाग घेतला व वातावरण अगदी आनंदाने बहरून गेले. यावेळी मुलींनी बॅडमिंटन देखील पोलिसांबरोबर खेळून खेळाबद्दल असलेली आवड दाखवून दिली.

यावेळी प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, संतोष भोसले, आसिस्टंट कंमांडन्ट 37 बटालियन, पी आय शीतला प्रसाद, पो उप नि विजय सपकळ, महिला पोलीस शिपाई रेश्मा गेडाम, वैशाली चव्हाण, टेकाम, आत्राम, चौधरी, आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

 

 

आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर 

अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.