Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

कोल्हापुरात जाधववाडी येथील राहणाऱ्या प्रिया पाटील हि सी. पी. आर. या रुग्णालयात शववाहीका गाडीवर कोरोणाने मृत्यू झालेले प्रेत घेऊन पंचगंगा स्मशानभूमीत जाते. फक्त चालकाचं काम करत नाही तर प्रेत उचलण्यासाठी सुद्धा ती मदत करते. तिच्या या धाडसाबद्दल कोल्हापुरात तिचे कौतुक केले जात आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात काहीतरी सेवा करावी म्हणून तीनं शववाहिका चालक म्हणून काम मिळावे यासाठी अर्ज केला. काम मिळत नाही तोपर्यंत शांत बसण्यापेक्षा कोरोना आटोक्यात यावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना तिने नाश्तापाणी वाटपाचे काम सुद्धा केले. स्वतः नाश्ता तयार करत वाटत फिरली ती. शेवटी तिला मनाजोगे काम मिळालं आणि सुरुवात केली शववाहिका चालक म्हणून काम करायला.

 

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोल्हापुरात जाधववाडी येथील राहणाऱ्या प्रिया पाटील हिची ही कहाणी. वाहन चालवायला शिकल्यानंतर आपण एक चांगलं चालक म्हणून काम करूया. चालक म्हणून काम करायचं असेल तर शववाहिका या गाडीवरच काम करूया. ते सुद्धा मोफत. समाजसेवेचे काम करायचं म्हणून तिने वडिलांच्या सह स्वतःही महानगरपालिकेच्या आयुक्तांना अर्ज केला.

 

अर्ज केल्यानुसार सेवा करायला संधी मिळत नाही म्हणून ती शांत बसली नाही. तिने घरातून खिचडी पाण्याची बाटली आदी साहित्य घेत रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांना वाटत फिरली. हे करत असतानाच शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांना प्रिया पाटील हिची माहिती पडली. त्यानंतर तिला लगेच चालक म्हणून काम करण्यासाठी बोलवून घेतले. सेवा करायची म्हणून संधीची वाट बघणारी प्रिया पाटील तिने लगेच होकार दिला आणि सुरुवात केली.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सध्या ती सी. पी. आर. या रुग्णालयात शववाहीका गाडीवर कोरोणामुळे मृत्यू झालेले प्रेत घेऊन पंचगंगा स्मशानभूमीत जाते. फक्त चालकाचं काम करत नाही तर प्रेत उचलण्यासाठी सुद्धा ती मदत करते. तिच्या या धाडसाबद्दल कोल्हापुरात तिचे कौतुक केले जात आहे.

सध्या ती विवेकानंद कॉलेजमध्ये बीएससी फर्स्ट या वर्गात शिकत आहे. योग शिक्षिका म्हणून सुद्धा ती काम करते.

हे देखील वाचा :

शिवाजीनगर येथे अत्याधुनिक बसस्थानक निर्माण करणार – परिवहनमंत्री ॲड अनिल परब

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

Comments are closed.