Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

शासनाने ०२ लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहिर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

नुकतेच ०२ लाख रुपये बक्षीस असलेली एक महिला नक्षलवादी नामे करीष्मा ऊर्फ गंगा ऊर्फ सविता अजय नरोठी हीने सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या समोर आत्मसमर्पण केले त्यांनतर त्यांनी तीचे हस्तांतरण गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडे केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

करीष्मा ऊर्फ गंगा ऊर्फ सविता अजय नरोठी वय-२० वर्ष रा. पुसगुट्टा पोस्टे वेटीया त. पाखांजूर जिल्हा कांकेर (छ.ग.) ही चातगाव दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. हिचेवर चकमकीचे ०४ गुन्हे दाखल असुन शासनाने ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपुर्ण यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच गडचिरोली पोलीसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरीता घेतलेले जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच जे तरुण-तरुणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी पोलीसांनी जावुन त्यांना सुखी जीवनाचे महत्व पटवून सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी मदत व आयोजित केलेल्या सहलीमुळे तसेच कार्यरत नक्षल सदस्यांचे  कुटुंबियाच्या मेळावे यामुळे त्यांच्या मनात पोलीस दलाविषयी निर्माण झालेला विश्वास याचा परीपाक म्हणुन आज या जहाल महिला नक्षलवाद्यांने आत्मसमर्पण केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकुण ३८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, २८ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

सदर महीला नक्षलीचे आत्मसमर्पण घडवुन मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई. सी.आर.पी.एफ.चे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन व गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली डीआयजी सीआरपीएफची आर.एफ.टी (रेंज फिल्ड टिम) या पथकाकडून करण्यात आली.

कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.

हे देखील वाचा  :

ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन

 

Comments are closed.