Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार तर 40 जखमी

रीवा येथील सुहागी हिल्सजवळ झाला अपघात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मध्यप्रदेश, 22 ऑक्टोबर :-  सद्या दिवाळीचा सण सुरू झाला आहे. अशातच एका भिषण अपघातामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. मध्यप्रदेशातील रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी आहेत. बस हैद्राबाद वरून गोरखपुरला जात होती. बसमधील सर्व लोक उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

मध्यप्रदेशातील रीवाजवळ राष्ट्रीय महामार्ग-30 वर हा भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचा माहिती रीवा पोलीसांनी दिली आहे. या भिषण अपघातात 40 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघात होताच घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठूण जखमींना रूग्णालयात दाखल केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रक यांच्या भिषण टक्कर झाल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. रीवाचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले कि, बस हैद्राबादवरून गोरखपूरला जात होती.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उदास आहात का?

भास्कर जाधवांची ही शेवटीची फडफड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.