Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात पकडले आक्षेपार्ह अवस्थेत!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातील बेंगाबाद गावात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर या जोडप्याची गावातल्या पंचांकडे तक्रार केल्यानंतर त्या दोघांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्या जोडप्याला पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले.

सदर महिला तिचा पती, सासू सासर, दीर व नणंद यांच्यासोबत या गावात राहायची. या महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. शुक्रवारी रात्री महिलेचा पती कामाला गेलेला होता. घरातील सर्व झोपल्यानंतर तिने त्याला घरात घेतले व आपल्या खोलीत घेऊन गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दरम्यान सासूला जाग आली तेव्हा तिला महिलेच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले. त्यामुळे तिने खोलीचे दार उघडायचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तिने खिडकीच्या फटीतून पाहताच तिला धक्का बसला. तिची सून एका परपुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत तिला दिसली. धक्का बसलेल्या सासूने घरातल्या इतरांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी सुनेच्या खोलीला बाहेरून कडी लावली.

सकाळ झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या या कृत्याबाबत गावच्या पंचांना सांगितले. त्यांनी त्या दोघांनाही घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना झाडाला बांधून त्यांना चपलांचा हार घातला व बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या दोघांची सुटका केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भारतीय डाक विभागात 2428 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र करणार आंदोलन…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.