Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीत अजित पवाराचा गद्दार पोस्टर झळकले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

दिल्ली, 06 जुलै – अजित पवारांच्या बंडानंतर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दुपारी तीनच्या सुमारास ही बैठक होणार आहे. या बैठकीआधी अजित पवार यांच्या गटाचा ‘गद्दार’ असा उल्लेख असणारे ‘बाहुबली’ स्टाईल पोस्टर दिल्लीत झळकले आहेत.

कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘गद्दार’ असा उल्लेख असणारे एक पोस्टर दिल्लीत लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे बाहुबली स्टाईल पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर कटप्पा घात करून बाहुबलीला तलवार खुपसताना दाखवण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुधवारी मुंबईत ‘पॉवर’ फूल गेम पहायला मिळाला. एका बाजुला अजित पवार, दुसऱ्या बाजुला शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. दोन्ही बाजुने जोरदार शाब्दिक चकमक झाली. अशातच अजित पवार यांनी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला. त्यामुळे शरद पवारांनी वेगाने पावलं टाकण्यास सुरुवात केली. पक्षावरील पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी गुरुवारी तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये संघटनेतील आगमी बदल, पुढील रणनीती आणि कायदेशीर पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.