Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी आदिवासी व्यक्तीचे पाय धुवत मागितली माफी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

भोपाल, 05 जुलै – मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रवेश शुक्ला नावाच्या भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाईचे आदेश दिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंगळवारी भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याचा मद्यधुंद अवस्थेत रावत यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काही तासातच रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी प्रवेश शुक्ला याला अटक केली.

दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी या प्रकरणातील पीडित दशमत रावत याला त्यांच्या निवासस्थानी भेटायला बोलावले होते. त्यानंतर चौहान यांनी रावत यांचा आदर सत्कार करून त्यांचे पायही धुतले. तसेच झालेल्या घटनेसाठी त्यांनी रावत यांची माफीही मागितली. ”झालेल्या घटनेचा व्हिडीओ पाहून मला अतीव दुख झालं. मी त्या साठी तुमची माफी मागतो. माझ्यासाठी जनता ही देवासमान आहे”, असे शिवराज सिंह चौहान यांनी दशमत रावत यांना सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.