Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी दुर्घटना! अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यामध्ये घटना 15 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिधी 25 फेब्रुवारी :- मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) तीन बसेस आणि एक ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी असलेल्या ५० जणांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.हा अपघात झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जखमींना भरती केलेल्या रुग्णालयाला भेट दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शबरी मातेच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील सतनामध्ये कोल समाजाचा महाकुंभ 24 फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले होते. या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते. कार्यक्रम आटोपून अनेक जण आपल्या गावाकडे परत निघाले. परतणाऱ्या लोकांसाठी मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. तीन बसेस त्यासाठी थांबल्या होत्या. ट्रकने धडक दिली तेव्हा काही प्रवाशी जेवणाची पाकिटे घेऊन बसमध्ये बसली होती. परंतु या तीन बसेसला ट्रकने धडक दिल्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, सिधी येथे बस उलटल्याने झालेल्या अपघाताची दुःखद बातमी मिळाली आहे. या अपघातातील मृत्युमुखींना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी आणि या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर घटनास्थळी सिधी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. घटनास्थळी सिधी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि एसपी उपस्थित आहेत. रेवा आयुक्त आणि आयजी घटनास्थळी पोहोचले आहेत. रेवा मेडिकल कॉलेज आणि सिधी जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.