Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, वाचा काय झाली चर्चा…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई 25 फेब्रुवारी :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा हेही उपस्थित होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आल्याचे सांगण्यात येते.

या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी “अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. उद्धवजी हे सिंहाचे पुत्र आहेत. उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा आहे. देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. आम्ही हे नाते पुढे नेऊ” असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘भाजपची फक्त गुंडगिरी’

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भाजप फक्त गुंडगिरी करतो. ईडी आणि सीबीआयचा वापर भ्याड लोक करतात. सध्याचे केंद्र सरकार ज्या प्रकारे भांडवलदारांना लाभ देत आहे, देश भांडवलदारांना विकला जात आहे. LIC विकल्याचं आज कळलं, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीच्या जनतेने आम्हाला दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत बहुमत दिले. स्थायी समितीत आमचे बहुमत आहे. या देशात पक्ष फक्त निवडणुकीचा विचार करतो.

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी “महाराष्ट्र आणि पंजाब यांचे अतूट नाते आहे, पंजाब, बंगाल, उत्तर प्रदेश या सर्वांनी मिळून स्वातंत्र्याचा लढा दिला. या देशाला खूप बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे, ते स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचे आहे, देशाला पुढे कसे न्यायचे आहे याचा विचार करायचा आहे, आपला देश हा सोन्याची चिडिया आहे, पण हे लोक पंख उपटून खात आहेत. आता लोक देश सोडून पळून जात आहेत. उद्धवजींचा पक्ष चोरीला गेला, पण मी एकच सांगतो. बाळासाहेब सिंह होते, उद्धवजींना सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल.” असेही भगवंत मान म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी कशी मजबूत करता येईल यावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मार्चच्या अखेरीस उद्धव ठाकरे मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची मोठी बैठक आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.

हे पण वाचा :-

Comments are closed.