शेतकऱ्याच्या ‘भारत बंद’ मध्ये काँग्रेस सहभागी होणार
-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ६ डिसेंबर : मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्याच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सक्रिय पाठिंबा देण्याची घोषणा आज ६ डिसेंबर रोजी केली.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात जनमत एकवटले आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी या कायद्यांना विरोध केला आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फे?्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबर रोजी ‘ भारत बंद ‘ची हाक दिली आहे. शेतकऱ्याच्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
Comments are closed.