इशान किशनने आक्रमक खेळी करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ठोकला दावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून भारतीय संघाचा माजी विकेटकीपर फलंदाज इशान किशन टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट मध्ये जोरदार खेळी करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी कमबॅक करण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी झालेला दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यापासून विकेटकीपर फलंदाज इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. किशनने शेवटचा वनडे सामना ऑक्टोबर 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर बीसीसीआयने इशान किशनला टीममध्ये कमबॅक करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिलेला होता. त्यामुळे इशान किशन गेल्या काही दिवसापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा फेबृवारी २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाणारअसल्याने खेळाडूना उत्तम संधी आहे.
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत इशान किशनने झारखंडकडून खेळताना आक्रमक खेळी करत अवघ्या 78 चेंडूत 134 धावांची जबरदस्त खेळी केली असून त्यामध्ये 16 चौकार आणि 6 षटकार मारले. असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली आहे. उर्वरित सामन्यात एक किंवा दोन मोठ्या खेळी तर ईशानच्या नावाचा विचार होऊ शकतो. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ अजून जाहीर केलेला नसून निवड समितीचा काही खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इशान किशनच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.