Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इस्त्रोचा स्वदेशी उपग्रह PSLV C 49 झेपावला अवकाशात .

Get real time updates directly on you device, subscribe now.

शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग होणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

श्रीहरीकोटा : इस्रोची या वर्षातली श्रीहरिकोटाहून उपग्रह प्रक्षेपणाची पहिली मोहीम दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी उपग्रह पार पडली. PSLV C 49 या प्रक्षेपकाद्वारे EOS -01 हा स्वदेशी उपग्रह अवकाशात पाठवला गेलाय. शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर चीनच्या हलचाली या उपग्रहाद्वारे टीपता येणार आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मुख्य उपग्रहाबरोबर ल्युथीआना देशाचा एक तर लक्झेंबर्ग आणि अमेरिकेचे ४ छोटे उपग्रह पाठवले जाणार आहेत. याआधी 5 मार्च ची GIAT-01 उपग्रह प्रक्षेपणाची श्रीहरिकोटा इथली मोहीम तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आली होती. तर १७ जानेवारीला GSAT30 नावाचा उपग्रह युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने अवकाशात पाठवला होता. कोरोना संकटामुळे तब्बल ८ महिन्याच्या कालावधी नंतर इस्रो पुन्हा एकदा भारतीय भूमीवरून उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. अवकाश क्षेत्रात अनेक उल्लेखनीय मोहिमा यशस्वीपणे पार पाडलेल्या इस्रोच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.