Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट.

विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट अपघात रोखण्यासाठी केले मेहनतीने संशोधन; विविध सुविधांनी युक्‍त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली जिल्ह्याच्या विटा येथील सामान्य कुटुंबातील युवकाने अत्याधुनिक पद्धतीचे हेल्मेट कल्पकतेने व मेहनतीने बनवले आहे. अपघात रोखण्यासाठी, मोटारसायकल चोरी होऊ नये व हेल्मेट वापरणे सुखावह होण्यासाठी विविध युक्‍त्या करून भोजलिंग कुंभार याने या अभिनव हेल्मेटचे संशोधन केले आहे. खानापूर रस्त्यावरील प्रांत कार्यालयाच्या मागे राहणारा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून वायरिंग फिटिंगची कामे करणारा युवक भोजलिंग एकनाथ कुंभार.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी काय करावे? याचा विचार करू लागला आणि त्यातूनच अत्याधुनिक हेल्मेटची निर्मिती झाली. फारसा खर्च न करता टाकाऊ किंवा कामात नसलेल्या वस्तूंपासून विविध सोयी-सुविधा करून सुरक्षित व वापरायला सुलभ असे हेल्मेट मोठ्या हिमतीने तयार केले. सहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आजीची पेन्शन व आईचे कष्ट, या आधारावर शिक्षण घेतले. आयटीआयनंतर शिक्षण बंद करून फिटिंगचा व्यवसाय करणे भाग पडले. काही निकटवर्तीयांचा अपघाती मृत्यू झाल्याने, हेल्मेटमुळे अपघातात प्राण वाचू शकतो, हेल्मेट वापरासाठी लोकांना प्रवृत्त केल्यावर अनेक गोष्टी साध्य होतील, असे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने यावर काम करायला सुरवात केली.


हेल्मेटमध्ये रिसिव्हर आणि ट्रान्समीटर असे दोन प्रकारचे सेन्सर बनवले आहेत. चिपद्वारे “आयसी’ला प्रोग्रॅमिंग केले आहे. अत्याधुनिक यंत्रणा व सुरक्षिततेच्या अनेक उपाययोजना असल्याने तसेच मोटारसायकल चोरी होणार नाही, अशी यंत्रणा हेल्मेटमध्ये उपलब्ध असल्याने मोटारसायकलचालकांना हेल्मेट अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मध्यमवर्गीयांसाठी परवडेल व सहज वापरता येईल, अशी साधी सोपी रचना यामध्ये आहे. चोरांपासून बाइकचे संरक्षण, अपघातावेळी इमर्जन्सीसाठी ऑटोमॅटिक कॉलची सुविधा, रात्री पार्किंगमधील बाइक शोधण्यासाठी वायरलेस हेडलाईट सिस्टीम, बाइक संरक्षणासाठी वायरलेस हॉर्न सिस्टीम आदी सुविधा यामध्ये आहेत. यात गुगल मॅप इनबिल्ट असल्यामुळे प्रवासात वाया जाणारा वेळ आणि पेट्रोल वाचू शकते. इनबिल्ट चावीसाठी कोडिंग हार्डवेअर सिस्टीम असल्यामुळे हेल्मेट असताना बाइकला चावीची गरज भासणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बाइकचालकाने हेल्मेट घातले नाही, तर बाइकला चावी तर लागणारच नाही; शिवाय बाइकचा वेगही ताशी 40 किमीपर्यंत मर्यादित राहील. याउलट हेल्मेट घातले तर बाइकला चावीची गरज भासणार नाही आणि स्पीडही 120 पर्यंत वाढू शकेल.विशेष म्हणजे यातील सर्व सुविधा सौर ऊर्जेवर चार्ज होते. आणीबाणीच्या वेळी हेल्मेटवर 9 वॅट प्रकाश पडेल एवढी लाईट लागते. याशिवाय हेल्मेटमध्ये मोबाईल फोन चार्जिंग सोय.

मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टम, ब्रेक लाईट, मोबाईलवरचे कॉल हेल्मेटमध्येच रिसिव्ह करता येणे, वॉटरप्रूफ अशी अनेक वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. भोजलिंग याने हेल्मेटचे पेटंटही करून घेतले आहे. योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या हेल्मेटला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल, असा विश्‍वास भोजलिंग कुंभार यांना आहे.

Comments are closed.