Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

लाखो लोकांची प्रायव्हसी वाचवली; फेसबुक-इन्स्टग्रामने दिले 22 लाखांचे बक्षीस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सोलापूर : जिल्यातील बार्शी येथील मयूर फरताडे याने फेसबुक इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून काढला आणि फेसबुकला कळवला आणि करोडो लोकांची प्रायव्हसी वाचवली, हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचे बक्षीस दिलंय.

भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.

मयूर फरताडे याने त्याच्या कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचविले. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बार्शी तिथं सरशी म्हणतात ते काही खोटं नाही, बार्शी ही विविध नाविन्यपूर्ण कल्पनांची आणि खाण आहे त्याच्यातून मयूरसारखे हिरे सतत निपजत असतात, फक्त त्याकडे शासन,प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री

राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.