Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नववर्षाच्या स्वागतानिमीत्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास नयनरम्य फळा-फुलांची आरास

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पंढरपूर, दि. ०१ जानेवारी : नवीन वर्षारंभाच्या २०२२ निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल १५०० किलो फुले आणि ७०० किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील (आळंदी, पुणे) यांनी फुले उपलब्ध करून दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवर्षाच्या स्वागता निमित्तानं श्री विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर आकर्षक फळांनी आणि फुलांनी सजवण्यात आलय. आकर्षक फुलांच्या आणि फळांच्या सजावटीने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे रूप मनःमोहक दिसून येत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन वर्षाची सुरूवात श्रीच्या दर्शनांने व्हावी म्हणून आज पहाटे पासून पंढरीत भाविकांची गर्दी दिसून आली. गुलाब, जरबेरा, ब्लूडीजे, कामीनी, शेवंती, अरकेट, मिनीपाम, गोप, ड्रेसीना या फुलांच्यासह केळी, अनन्नस, संत्री, मोसंबी, सफरचंद, दाळींब फळांच्या रंगसंगतीचा वापर करुन आरसा करण्यात आली.

 

आळंदीचे प्रदिप ठाकुर यांनी नवनर्षानिमित फुलांची आणि फळांची आरास केली. यासाठी १५०० किलो फुल आणि १ हजार किलो फळांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरात श्रीचे मुखःदर्शन घेऊन  भाविकांनी नववर्षाची सुरूवात केली.

हे देखील वाचा : 

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.