Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव येथिल घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. १ जानेवारी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात नववर्षाच्या पुर्वसंध्येला नववर्षाची पार्टी साजरी करने एका २८ वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली असून पाण्याच्या मोह न आवरल्याने मौज मस्ती साठी नदी पात्रात उतरलेल्या युवकाचा नदीपात्रातील खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबरच्या २०२१ रोजी सायकांळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पंढरी काळसर्पे (२८) असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक राहुल काळसर्पे हा रा. महागाव येथील असून हा आपल्या मोठ्या भाऊ नामे रवि पंढरी काळसर्पे व काही मित्रांसोबत केशोरी येथुन जवळच असलेल्या खोळदा येथे नववर्षाच्या पुर्वसंध्येला पार्टी करिता गेले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेवन बनवुन राहुल हा आपल्या भावा व मित्रासोबत मौज मस्ती करण्यासाठी गाढवी नदीच्या पात्रात उतरुन खोल असलेल्या डोहात गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल बुडु लागला. तो पाण्यात दीसेनासा झाल्याने त्याच्या मोठ्या भावाने गावातील लोकांच्या मदतीने शोध कार्य सूरु केले.

सदर घटना दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली असून खोल डोहात गेलेल्या राहुलचा लोकांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले असता तब्बल २ तासानंतर म्हणजे सायंकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनेची माहिती अर्जुनी/मोरगाव आणि केशोरी पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन राहुल काळसर्पे याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटने ची नोंद पोलीस स्टेशन केशोरी येथे दाखल करण्यात आली असून नववर्षाच्या पूर्व संध्येला एका युवकाच्या करुण मृत्यु झाल्याने महागावात शोककळा पसरली आहे.

या घटनेचा अधिक तपास केशोरीचे ठाणेदार संदीप इंगळे करीत आहे.

हे देखील वाचा : 

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड

येत्या फेब्रुवारी महिन्यात ८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

 

Comments are closed.