Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोरीनं चारचौघात लाज काढली, काजोलसमोरच न्यासाने केलं असं काही… झाली ट्रोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
एका यूजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर लिहीले की, आजची जनरेशन पालकांसोबत फोटो घ्यायला इच्छूक नसते, तर एकाने लिहीले, “ही तर कायम आपल्या आईला लाज आणते”, सूरज कृष्णा नावाच्या एका युजरने लिहीलेय, “ही आजकालची मुलं सर्वांसमोर आई-वडिलांचा अपमान करतात”. तर काहींनी न्यासाची बाजू घेतली आहे, एकाने लिहीलेय ” तिला फोटो नाही काढायचा होता तो तिचा निर्णय आहे”. तर एकाने लिहीले, “एकटीचा फोटो काढण्यासाठी तिने नकार दिला. अखेर तो तिचा निर्णय आहे”.

वृत्तसस्था दि ०२ एप्रिल : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण सध्या चर्चेत आली आहे. नुकत्याच एका इव्हेण्टमध्ये काजोलसमोरच न्यासाने असे काही केले की युजर्संनी पोरीनं चारचौघात लाज काढली असं म्हणत न्यासाला ट्रोल केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईत नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर लॉन्च इव्हेण्टमध्ये देश-विदेशातील अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावली होती. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही बॉलीवूड कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. या इव्हेंटमधील अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यातलाच एक अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

https://www.instagram.com/reel/Cqf_lWuPzzk/?igshid=YmMyMTA2M2Y=

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर लॉन्च इव्हेण्टमध्ये अभिनेत्री काजोल आणि न्यासाही पोहोचली होती. या दरम्यान दोघींनी पॅपराजींसमोर पोझ दिल्या. काही पोज दिल्यानंतर दोघी तिथून निघत असताना न्यासाला सोलो फोटो देण्याची पॅपराजींनी मागणी केली. त्यावर काजोलने तिला इशाऱ्यातूनच फोटो काढायला सांगितला मात्र न्यासाने नकार दिला. व्हिडीओ पाहिल्यावर दिसतेय की, काजोलला न्यासाने थेट नकार दिला आहे. ही गोष्ट युजर्संना खटकली आणि युजर्स सोशल मीडियावर तिला ट्रोल करू लागले.

एका यूजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर लिहीले की, आजची जनरेशन पालकांसोबत फोटो घ्यायला इच्छूक नसते, तर एकाने लिहीले, “ही तर कायम आपल्या आईला लाज आणते”, सूरज कृष्णा नावाच्या एका युजरने लिहीलेय, “ही आजकालची मुलं सर्वांसमोर आई-वडिलांचा अपमान करतात”. तर काहींनी न्यासाची बाजू घेतली आहे, एकाने लिहीलेय ” तिला फोटो नाही काढायचा होता तो तिचा निर्णय आहे”. तर एकाने लिहीले, “एकटीचा फोटो काढण्यासाठी तिने नकार दिला. अखेर तो तिचा निर्णय आहे”.

नीता मुकेश अंबानी अंबानी कल्चरल सेंटर लॉन्च इव्हेंटमध्ये शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, रजनीकांत, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, रेखा यांसारखे बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स पोहोचले होते. तर हॉलीवूडमधून आणि स्पायडर-मॅन फॅन टॉम हॉलंड, झेंडाया आणि गिगी हदीद सारखे कलाकारही उपस्थित होते.

हे देखील वाचा ,

क्रीडापटू आजारी नागु कोडापेला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.

गोडाऊन च्या बांधकामाकरिता जमीन खरेदी साठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले आर्थिक मदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.