Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेनेला शिक्षा झाली पाहिजे… अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05, सप्टेंबर :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यावर अमित शहा यांनी राजकीय मिशनला सुरुवात केली आहे. शिवसेनेला टार्गेट करत आपली भविष्यातली नीती काय असेल हे शहांनी स्पष्ट केले आहे.

मात्र शतप्रत भाजपा असे न म्हणता पुढचा मुंबईचा महापौर हा भाजपाचाच असेल हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करून एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे असंही सूतोवाच केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली.फक्त दोन जागेसाठी शिवसेने युती तोडली. आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केलं नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राजकारणात धोका देणाऱ्यांचे राजकारण यशस्वी होत नाही. राजकारणात धोका सहन करू नका .महानगरपालिका जिंकण्यासाठी तयारीला लागा. महानगरपालिकेसाठी भाजप- शिंदे गटाचं १५०चं टार्गेट मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे ‘

खयाली पुलाव’ मुळे शिवसेनेची ही अवस्था . शिवसेनेने आमच्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचंय. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार. आपली ही शेवटची निवडणूक आहे असं समजा, कारण अभी नही तो कभी नही ! असे त्यांनी शेवटी स्पष्ट शब्दात सुनावले.

हे देखील वाचा :-

अमित शहांचा आजचा दौरा गणेश दर्शन का राजकिय मुंबईमिशन ?

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी जवळ अपघाती निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.