Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आहे. मेहुणीच्या लग्नासाठी सासरी गेलेल्या जावयावर मेहुण्याने पेट्रोल टाकून जाळल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत जावई गंभीररित्या होरपळला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हमीरपूर जिल्ह्यातील पौथिया गावातील गुरुप्रसाद यांच्या लहान मुलीचे ६ जूनला लग्न होते. लग्नासाठी सवरापुर येथे राहणारा मोठा जावई सुरेश आणि मुलगी शिवकांती तीन मुलांना घेऊन माहेरी आले होते. लग्नसमारंभ झाल्यानंतर सुरेश मेहुणा बृजेशसोबत बाहेर गेला होता. येताना दारु पिऊन घरी आला आणि दारुच्या नशेत बायकोला घरी घेऊन जाण्याचा हट्ट करु लागला. दारुच्या नशेत असलेल्या सुरेशला बायकोने घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि तो तिला मारहाण करु लागला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डोळ्यादेखत मुलीला मारत असल्याने संतापलेले वडील गुरुप्रसाद मध्ये पडून त्याला मारायला लागले. मारहाण करताना सुरेश खाली पडला, त्यावेळी भावोजींच्या सततच्या तमाशाला कंटाळलेल्या बृजेशने बाईकमधून पेट्रोल काढून भावोजीवर टाकले. नंतर माचिसची पेटती काडी टाकून त्यांना जाळले. अखेर घरातल्या लोकांनी आग विझवून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच सुरेशच्या घरचेही तिथे आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेशचे त्याच्या सासरच्यांशी पटत नव्हते. त्यांच्यात वाद व्हायचे. तर सुरेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली असून तिचा नवरा कायम दारु पिऊन मारहाण करतो. त्यामुळे ती वरचेवर मुलांसोबत माहेरी येऊन राहते. याप्रकरणी ललपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश यादव यांनी घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मुंबईत येत्या २५ जून ला मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन

एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.