Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपचा आयटी सेलप्रमुख तोएबाचा दहशतवादी ; जम्मूतील अटकेच्या कारवाईतून धक्कादायक खुलासा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था दि,४ जुलै :  रविवार ला जम्मू-कश्मीरमध्ये
अटक करण्यात आलेला लश्कर-ए तोएबाचा वॉण्टेड दहशतवादी भाजपचा सक्रिय पदाधिकारी होता. तो जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या आयटी सेलचा प्रमुख म्हणून कार्यरत होता, असा धक्कादायक खुलासा अटकेच्या कारवाईनंतर झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. यावर भाजपने ऑनलाइन सदस्य नोंदणीला जबाबदार धरले आहे.

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना टार्गेट करून हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली सुरक्षा दलांनी तालिब हुसैन शाह व त्याच्या साथीदाराला रविवारी सकाळी अटक केली. या दोघांना जम्मूच्या रियासी भागात गावकऱयांनी पकडले. दोघांकडून दोन एके रायफल, अनेक ग्रेनेड्स आणि इतर शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. गावकऱयांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अटक करण्यात आली. यापैकी तालिन शाह हा लश्कर-ए-तोयबाचा एक वॉण्टेड दहशतवादी होता. तो याआधी भाजपचा सक्रिय सदस्य होता. त्याच्याकडे जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या सोशल मीडियाची प्रमुख जबाबदारी सोपवली गेली होती. अटकेच्या कारवाईनंतर त्याची भाजपमधील सक्रियता उघड होताच सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.