Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्धव ठाकरे यांना जबरदस्त झटका…एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते..

अजय चौधरी, आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द ..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई प्रतिनिधी/ दि.३ जुलै

 

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. कारण विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं, तसेच, अजय चौधरी यांची गटनेते पदी केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे पत्र विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. शिवाय अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती देखील रद्द केली असून बंडखोर गटाने केलेली भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली असून, सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद पदी केलेली नियुक्ती रद्द केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विधिमंडळ सचिवालया चे उप सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्या स्वाक्षरीने शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर, शिवसेना विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना पत्र दिले आहे. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावरुन एकनाथ शिंदे, वि. स.स. यांना दूर करुन अजय चौधरी, वि.स.स. यांची निवड करण्यात आली होती. याबाबत एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दिनांक २२ जून, २०२२ रोजीच्या पत्रान्वये आक्षेप नोंदविण्यात आला होता.याबाबतील कायदेविषयक तरतूदींचा ऊहापोह करुन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी अजय चौधरी, वि.स.स. यांना शिवसेना विधीमंडळ पक्षाचे म्हणून दिलेली मान्यता रद्द करुन श्री एकनाथ शिंदे, वि.स.स. यांची दिनांक

३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवून तसेच सुनिल प्रभू.वि.स.स. यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन त्याऐवजी भरत गोगावले, वि.स.स. यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या आपल्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विधान सभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबरदस्त धक्का दिला आहे. त्यामुळे या या प्रकरणी शिव सेनेकडून विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाई विरोधात न्यायालयात आव्हान दिले जाईल , अशी त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती यासाठी सुरू असलेली शिवसेना आणि शिंदे गटातील ही कायदेशीर लढाई आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Comments are closed.