Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिनी शेट्टी हिने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ चा किताब

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था दि, 4 जुलै : हिंदुस्थानला नवीन मिस इंडिया मिळाली असून कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shetty) हिने यंदाचा ‘मिस इंडिया 2022’ (Femina Miss India 2022) हा किताब पटकावला आहे.

3 जुलैला मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंडिया 2022’च्या फायनलमध्ये सिनी शेट्टी हिने 31 स्पर्धकांवर मात करत मिस इंडियाचा मुकूट आपल्या नावावर केला.फायनलमध्ये राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चव्हाण दुसरी रनर स्टार ठरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हन्शन सेंटरमध्ये यंदाच्या ‘मिस इंडिया 2022′ची अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांनी आपल्या सौंदर्याने आणि हुशारीने सर्वांना भूरळ घातली. मिस इंडियाच्या मुकूटासाठी रुबल शेखावत, सिनी शेट्टी आणि शिनाता चौहान यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. मात्र सिनी शेट्टी हिने बाजी मारत ‘मिस इंडिया 2022‘ चा बहुमान पटकावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.