Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था 4 जुलै :- हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये  भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात 16 लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून 15 ते 16 जण प्रवास करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून काही स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मदत आणि बचाव कार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना कुल्लू रुग्णालयात नेण्यात आले. बसमध्ये काही मृतदेह अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खराब झालेली बस जेसीबीच्या साहाय्याने उघडण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त, 
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून सानुग्रह मदत जाहीर

माचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएमआरएफ) पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;-  हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi”

“पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी बस दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे.जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.”

Comments are closed.