Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर व जनजागरण मेळावा संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २३ डिसेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक(प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,  अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा सुजितकुमार क्षिसागर यांच्या नेतृत्वात दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी उप पोलीस स्टेशन दामरांचा येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य जनजागरण व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मेळाव्यामध्ये हद्दतील २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गरजू लोकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर मेळाव्यामध्ये उपस्थित सर्व गरजूवंत महिलांना साडी, वृद्ध महिलांना नववारी साडी, वृद्ध पुरुष यांना धोतर व थंडीचे ब्लॅंकेट असे एकूण २०० लोकांना साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांना पारितोषिक देण्यात आले. शेवटी सर्वासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

सदर मेळाव्याप्रसंगी उप पोस्टे दामरांचा प्रभारी पोउपनि सचिन घोडके, पोउपनि बालाजी चव्हाण, पोउपनि उमेश कदम, पोउपनि शिवराज लोखंडे तसेच जिल्हा पोलीस, क्यू.आर.टी अंमलदार व एसआरपीएफ अंमलदार यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स उभारून युवकांसाठी रोजगार निर्मिती करा – खा. अशोक नेते

प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.