Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कौशल्य विकास मंत्रालयाचे “स्किल हब” योजनेतील रायगड जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरू.

जे.एस.एस. रायगडचा स्किल हब साठी विशेष पुढाकार. "जिल्ह्यातील १०० युवकांना रोजगार देणार." - विजय कोकणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रायगड, दि. ३१ मार्च : कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत केंद्र सरकार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नेरळ येथे जन शिक्षण संस्थान रायगड व करिअर टेकनिकल ट्रैनिंग इंस्टीट्यूट नेरळ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्किल हब साठी पुढाकार घेण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे कौशल्य विकास मंत्रालयाचे “स्किल हब” योजनेतील रायगड जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरू करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येथे असिस्टंट इलेक्ट्रिशियन व फिल्ड इंजिनीअर RACW च्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन आज दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी नेरळ येथे संपन्न झाले.

सदर योजनेत संपूर्ण भारत देश भरात ५००० “स्किल हबच्या” माध्यमातून ८ लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले असून त्यासाठीची रायगड जिल्ह्यातील पहिल्या “स्किल हब” ची सुरुवात करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर स्किल हबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गामध्ये इलेक्ट्रिशियन व एसी, फ्रिज व वॉशिंग मशीन रिपेरिंग इत्यादी आधुनिक उपकरणांवर प्रशिक्षण, सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या कर्तुत्वाने स्वबळावर स्वयं रोजगार प्राप्त करता येणार आहे.

भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगड चे संचालक विजय कोकणे ,कोलारे ग्राम पंचायत सदस्य व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.

सदर प्रशिक्षण वर्गामध्ये इलेक्ट्रिशियन व एसी, फ्रिज व वॉशिंग मशीन रिपेरिंग वर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गणेश भोपी व विजय रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : 

एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो – अजित पवार

गेल्या ५० वर्षात चंद्रपुरात प्रथमच मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद

 

Comments are closed.