शिवजंयती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तलवारीवर शिवसृष्टी..
विद्यार्थीपूरक नाविन्यपुर्ण उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांनी आपल्या शाळेत विविध वस्तूंचा वापर करून एक तलवार बनवली आहे. या तलवारीवर त्यांनी शिवाजी महाराजांची ‘शिवसृष्टी’ उभारली आहे.
अमरावती, दि. १९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून ५५ फूट लांब व १० फूट रुंद अशी भव्य तलवार तयार करून शिवसृष्टी साकारली आहे.
एक क्विंटल पन्नास किलोची तलवार रुपी कलाकृती तयार करण्यासाठी कागदी पुठ्ठा, टाकाऊ कागद, कापड , फेविकॉल या विविध वस्तूंचा वापर करून या नाविन्यपर्ण तलवारीची प्रतिकृती १८ दिवसात पूर्ण साकारलेली आहे. विद्यालयातील, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या तलवारीवर शिवकालीन वस्तूंची मांडणी करून शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.
महाराजांचे एक ऐतहासिक आभूषण म्हणून तलवारीची मांडणी केली आहे. या तलवारीवर मा जिजाऊ यांची चंद्रकोर, मोठी शिवपिंड, जिरेटोप, मावळाटोपी, किल्ला, राजमुद्रा, ध्वज, विविध शिवकालीन आभूषण इत्यादींची मांडणी तलवारीवर अंकित केली आहे. विद्यार्थ्यांच्या या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे देखील वाचा :
Comments are closed.