Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन पट्टयांच्या GPS मोजणीच्या नावाने आदिवासींची लूट …

श्रमजीवीच्या आंदोलनाने मिळाला न्याय....

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

डहाणू/कासा दि. २३ जून

वन पट्ट्यांची GPS मजणी करून देतो असे सांगून वन विभागाच्या नावाने आदिवासींकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील कासा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने तात्काळ दखल घेत पिडीत आदिवासींच्या हक्कासाठी आज सहाय्यक वनरक्षक वनविकास महामंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे सर्व पिडीत आदिवासी बांधवांनी श्रमजीवी संघटनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कासा सहाय्यक वनरक्षक वन विकास महामंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बऱ्हाणपूर चिंच पाडा येथील जवळपास ४० वन पट्टे धारक आदिवासी बांधवांना त्यांच्या अतिक्रमित जागेची वन विकास महामंडळाकडून मोजणी करून देतो असे सांगून एका भामट्याने प्रत्येकी ११००/- रुपये उकळले होते. आदिवासींच्या लुटीची ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे याबाबत दाद मागण्यासाठी आणि दोन वर्षांपासुन प्रलंबित असलेली जी.पी.एस मोजणी अजुन का होत नाही या विषयांचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत येथील वनपाल श्री.गायकवाड यांनी जी पी एस मोजणी साठी एकही रुपया घेतला जाणार नाही याची हमी देत, संपूर्ण चौकशी केल्यानंतर सदर पैसे गावातीलच वाज्या सुक्रया तांबडा या व्यतिने घेतले असल्याचे समोर आले . त्यानंतर श्री गायकवाड यांनी वाज्या तांबडा याला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून रुपये ४०,००० रक्कम वसूल करून पिडीत सभासदांच्या दिली. तसेच प्रलंबित ३५० वनदाव्यांची जी.पी.एस मोजणीचे नियोजन करून येत्या १० दिवसात मोजणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे पिडीत वन पट्टेधारकांनी श्रमजीवी संघटनेचे आणि आंदोलकांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, आजचे धरणे आंदोलन श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि सरचिटणीस विजय भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश उंबरसाडा, पालघर तालुकाअध्यक्ष दिनेश पवार,ता.सचिव. सुरेश बरडे, उपाध्यक्ष.मनोज कवळी, उल्हास पाटील, गणपत पुजारा,अरविंद भाऊ , डहाणू तालुका उपाध्यक्ष जितू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.