Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षलने केली एका इसमाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि, २३ जून : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका इसमाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली.

लकीकुमार ओक्सा (३८) असे मृत इसमाचे नाव असून तो बिनागुंडा येथील मूळ रहिवासी होता. लकीकुमार ओक्सा हा मलमपोडूर येथे तेंदूपत्ता फळीवर मुंशी म्हणून काम पाहत होता. काल रात्री १० वाजता सशस्त्र नक्षलवादी मलमपोडूर येथे गेले. त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नंतर तीक्ष्ण शस्त्राने त्याची हत्या केली.

आज सकाळी गावाबाहेर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Comments are closed.