Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे ३० हजाराची लाच स्वीकारता पकडले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, २२ जून : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता ३० हजारांची लाच स्वीकारताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.

कार्यालयातच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा यशस्वी केला. भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष भगवान केदार हे गुत्तेदार आहेत.त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या विकासकामांचे बील प्रलंबित असल्याने बील काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याने लाच मागतली.

याप्रकरणी सदरील गुत्तेदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज बुधवारी ( दि . २२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दुपारी १ वाजताच्या  सुमारास ३० हजारांची लाच स्वीकारताना कोकणे यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Comments are closed.