Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

SRPF जवानाने आपल्या सहकाऱ्याची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करून स्वतःही केली आत्महत्या!

अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्रातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १ जून :  अहेरी तालुक्यात येत असलेल्या मरपली पोलिस मदत केंद्र च्या अंतर्गत असलेल्या एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर स्वतःवर गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४:००ते ४:३० च्या सुमारास घडली आहे.

मृत एसआरपीएफ जवानाचे नाव श्रीकांत बेरड तर दुसऱ्या जवानाचे नाव ई के नवथर असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहिती प्रमाणे मरपल्ली पोलीस मदत केंद्र येथे कार्यरत असलेले पुणे राज्य राखीव दल गट क्र.1 कार्यरत असून यातील जवानात आपसात शाब्दिक बाचाबाची झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे ,त्यानंतर रागाच्या भरात जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या करुण लगेच स्वतःवर ही गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हत्येचे नेमके कारण पोलिसांच्या तपासात निष्पन्न होईल मात्र अधिक माहिती तपासाअंती अधिकृत मिळणार आहे .
सदर घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; देशातून श्रुती शर्माने मिळवला ऑल इंडिया रँक 1

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.