Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गडचिरोली जिल्हयातही ५०० हून अधिक लाभार्थी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या संवाद कार्यक्रमास उपस्थित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि ३१ मे : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी विविध केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीतील लाभार्थ्यांशी ऑनलाइन स्वरूपात संवाद साधला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमा अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उपस्थित लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी लाभार्थी संवाद कार्यक्रमात खासदार अशोक नेते व आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या 13 योजनांमधील लाभार्थी बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हास्तरावरील संबंधित योजनांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. गडचिरोली येथून झालेल्या कार्यक्रमास प्रास्ताविक तसेच सुत्रसंचलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी फर्नेंद्र कुतीरकर यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी मानले. ऑनलाइन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच एनआयसी मधील तांत्रिक समूहाने काम पाहिले.

हे देखील वाचा : 

5 जून ला एकलव्य निवासी शाळेची प्रवेशपूर्व परीक्षा

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन

UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; देशातून श्रुती शर्माने मिळवला ऑल इंडिया रँक 1

 

Comments are closed.