Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 भीषण अपघात! चालता ट्रक घरात घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भुसावळ, दि. ९ एप्रिल :  भुसावळ शहरातील तापी नदी जवळ असलेल्या आंबेडकर नगरातील एका घरात चालता ट्रक घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे आंबेडकर नगरात मोठी शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भुसावळहुन यावल कडे जाणाऱ्या मद्यधुंद ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक आंबेडकर नगरातील एका घराला जोरदार धडकला त्यात सम्राट दादाराव इंगळे (२१) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा दुसरा भाऊ या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेमुळे आंबेडकर नगरावर मोठी शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड ट्राफिक वाहतूक शाखेचे स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लग्न समारंभात वरात घेऊन जाणारा टेंम्पो पलटी; अपघातात १८ वऱ्हाडी गंभीर जखमी

धक्कादायक! एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे परिचारकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.