Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे परिचारकाची गळफास घेऊन आत्महत्या

पशुवैद्यकीय दवाखान्यात होता कार्यरत, कर्तव्यावर असतानाच घेतला गळफास, सोसाईड नोट लिहत केली आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा, दि. ९ एप्रिल :  देवळी तालुक्यातील नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या परिचारकाने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही’ अशी नोंद मृताच्या सोसाईड नोटमध्ये आढळून आल्याने नैराश्यात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

किसन ढगे (२९) रा. परभणी, असे मृताचे नाव आहे. तो नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. सध्या तो देवळी येथे किरायाणे राहत असल्याचे सांगण्यात आले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन मोठ्या पदावर जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी तो सतत अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते. याआधी त्याची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणाने हुकली. परंतु याच परीक्षेत त्याच्या मित्रांना यश मिळाल्याने किसन दु:खी झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरीचा भरती घोटाळा तसेच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपध्दतीचा निषेध करुन आत्महत्या करीत असल्याचे कळविले. ही फेसबूक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठली असता तोपर्यंत सर्व संपले होते. मृत किसन ढगे हा अविवाहित असून एमपीएससीच्या परीक्षेत सातत्याने आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विकासाच्या नव्या युगात उद्योगांची भूमिका महत्वाची; उद्योजकांनी सामाजिक विकासासाठीही योगदान देणे गरजेचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो- वडेट्टीवार

 

Comments are closed.