Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हृदयद्रावक घटना: अंगावर वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला.. संपूर्ण परिसरात हळहळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क.

मनोर प्रतिनिधी दि 20 जून  : पालघर तालुक्यातील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे एंबुर (टोकेपाडा) येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर अचानक वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यश सचिन घाटाळ असे या बालकाचे नाव आहे.

मनोर जवळील एंबुर (टोकेपाडा) येथील यश हा रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत होता, त्यावेळी त्याची आई श्रीमती निलम सचिन घाटाळ ही घरातील कामात मग्न होती. मात्र अचानक ढगांचा  गडगडाट सुरू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे पावसाची शक्यता वाटल्याने आईने यशला अंगणातून घरात येण्यास हाक देत ती अंगणात येणार इतक्यात ढगांचा जोरदार गडगडाट होऊन अंगणातील चिमुकल्या यशाच्या अंगावर वीज कोसळली. विजेचा झटका इतका मोठा होता की, त्यामुळे तात्काळ यश गतप्राण झाला. त्याला जवळच्या रुग्णालय नेण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. दोन वर्षाच्या या चिमुकल्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा, 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नरभक्षक वाघाने घेतला तिसरा बळी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.